मदर क्विन्स् इंग्लिश स्कुलचे ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडी च्या विदयार्थ्यांनी ‘रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल लेवल आर्ट’ स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादित केले
रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे कलरिंग, कोलाज मेकिंग, स्केचिंग, हॅन्डरायटिंग, टॅटू मेकिंग, फोटोग्राफी, फिंगर ॲन्ड थम पेंटींग, ग्रिटींग कार्ड, कार्टून मेकिंग इ. स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नर्सरी ते दहावी पर्यतचे ९५ विदयार्थी इंटरनॅशनल लेवल आर्ट स्पर्धेसाठी पात्र ठरले होते यापैकी १५ विदयार्थ्यांनी इंटरनॅशनल लेवल स्पर्धेत सहभाग घेतला यामध्ये स्केचिंग स्पर्धेत कु. मानसी मिलेश मालजी (इ.८वी) हिने तिसरा क्रमांक, कु. आर्यन अमित परब (इ.९ वी) व कु. हर्ष प्रसाद राऊळ (इ.४थी) यांना स्पेक्टॅक्यूलर परफॉमन्स अवॉर्ड, तसेच कु. अर्थवी परिक्षित मांजरेकर ( इ. ५वी), कु. काव्या चंद्रकांत सावंत (इ.६वी), कु.किमया किरण सावंत ( इ.८वी), कु.पियुष नारायण निर्गुण (इ.८वी), कु. दिपक सिताराम गावडे ( इ. ८ वी ), कु. प्रगती राजेंद्र सैनी ( इ. ९ वी ), कु. श्रेयस हेमंत रेडकर (इ.४ थी), कु.दिपल सतिश सावंत ( इ. ७ वी ), कु. पियुषा उमाजी राणे (इ.८वी), कु. पौर्णिमा भिमप्पा बाबजी ( इ. ७ वी ) यांनी इमर्जिग युथ आर्टीस्ट अवॉर्ड, तसेच कु. सलमा जावेदमिया शेख (इ.६वी) व कु. नॉर्विन नेलसन मेनेझेस (इ.५वी) यांनी कॉन्सोलेशन अवॉर्ड मिळवलेत्यांच्या या उत्तुंग यशाबददल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले, संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व संस्थेचे इतर पदाधिकारी, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकाकरणी समितीचे पदाधिकारी व विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे कला शिक्षक श्री. रोशन परब यांचे त्यांना अमुल्य मार्गदर्शन लाभले.

