राजन तेली यांची फिल्डींग टाईट आता कोणा बरोबर होईल फाईट
राजन तेली यांची फिल्डींग टाईट
आता कोणा बरोबर होईल फाईट
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे राजन तेली प्रमुख दावेदार
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काही अपवाद वगळले तर काॅग्रेस विचारसरणी चा होता,मात्र राजकारणात जस जसे बदल घडत गेले तसं तसे विचारही बदलू लागलेत काँग्रेस विचारसरणीचा हा मतदारसंघ अखेर शिवसेनेकडे झुकला, सह्याद्रीच्या पट्ट्यात वसलेला मराठा समाज यांनी मुक्त हाताने मदत केली व दोन वेळा शिवराम दळवी यांचा या मतदारसंघात विजय झाला, शिवराम दळवी यांची कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली होती, मात्र मतदारसंघावर हवा तसा प्रभाव नव्हता याचा फायदा उठवत आताचे शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी या मतदारसंघात फिल्डिंग लावायला सुरुवात केली, संभवानी युगे युगे हे महानाट्य आणून मतदारसंघातील जनतेला आध्यात्म्याची ओढ निर्माण करून देतानाच आपल्याविषयी आदर भावनाही निर्माण केली.
नगराध्यक्षाच्या कारकिर्दी नंतर ते पंधरा वर्षे मतदारसंघात काम करत राहिलेत व राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेत, त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ,वित्त राज्यमंत्री गृहराज्यमंत्री असे महत्त्वाची खाती केसरकरांकडे होती मात्र या पदांचा मतदारसंघाला हवा तसा फायदा झाला नाही,व याच कालखंडात विधान माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, राजन तेली हे शिवसेनेचे शिलेदार असल्याने त्यांना संपूर्ण सह्याद्रीचा पट्टा तेथील रहिवाशांच्या समस्या गारानी याची खडानखडा माहिती होती,त्यामुळे थेट घरात घुसत त्यांनी आपला जनसंपर्क सुरू ठेवला.
विधानसभेच्या निवडणुकीत सुरुवातीला अपक्ष नंतर राष्ट्रवादी,व शेवटच्या क्षणी भाजपचे शाल गळ्यात घालून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले या निवडणुकीत राजन तेली यांनी घेतलेली मते हे पुढच्या विजयाची नांदी ठरेल की काय असे वाटत असतानाच पुढील निवडणुकीत शिवसेना भाजपा युती झाल्याने राजन तेलींचा पत्ता कट झाला मात्र त्यांनी या मतदारसंघात अपक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडणूक लढवली, भाजपने त्यांना साथ दिली मात्र पक्ष चिन्ह नसल्यामुळे अवघ्या बारा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला मात्र पराभवाने खचून न जाता त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात अतिशय दुर्गम भागातही आपले कार्यकर्ते निर्माण केले ,कार्यकर्त्यांचे जाळे तयार झालेत,रात्री अपरात्री राजन तेली यांना कधी फोन लावला तरी तो फोन उचलून कार्यकर्त्यांचे ते काम करतात अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाल्याने आपसूकच त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा माहोळ तयार झाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हा भाजपला अनुकूल असल्याने अनेक जण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यात राजन केली यांनी म्हटल्याप्रमाणे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचीही नावे चर्चेत आहेत, ही सर्व नावे चर्चेत असली तरी या मतदारसंघाचे प्रमुख प्रबळ दावेदार म्हणून राजन तेली यांच्याकडेच पाहिले जाते ,कारण राजन तेली यांनी दोन वेळा निवडणूक लढवून भाजपकडे त्यावेळी कोणतीही ताकद नसताना किंवा त्यावेळी त्यांच्या सोबत नारायण राणेही नसताना त्यांनी मिळविलेली मते ही पुढील निवडणुकीत विजयाची देणारी होती, त्यामुळे राजन तेली मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र राजन तेली यांचे म्हणणे असे आहे की उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राजन तेली यांचे जवळचे संबंध असल्याने या मतदारसंघात जर सध्याचे सेना भाजप यांच्या युती झाली नाही तर राजन तेली यांनाच उमेदवारी दिली जाईल असे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे,त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर या मतदारसंघाकडे आपण विशेष लक्ष देणार असल्याचे राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले, खरे सांगायला गेले तर राजन तेली हा काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे, कोणतेही काम कार्यकर्त्यांनी सांगितले की हात न झटकतात ते कसे होईल याची काळजी घेणारे राजन तेली कार्यकर्त्यांना अधिक जवळचे वाटतात, शिवाय कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी प्रसंगी ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना तेली आपलेसे वाटायला लागले आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे राजन तेली बाहेरची व्यक्ती म्हणून आरोप केला जायचा आता शहराच्या मध्यवर्ती भागात गवळी नाका येथे आपले निवासस्थान उभारले आहे, त्यामुळे त्यांच्यावरील बाहेरील व्यक्ती हा ठपका ठेवला जाणार नाही व त्या ठिकाणी ते आपले कार्यालय थाटणार आहे त्यामुळे भविष्यात राजन तेली यांची या मतदारसंघावरील भक्कम पकड कार्यकर्त्यांच्या बरोबर असलेले ऋणानुबंध या विधानसभा मतदारसंघात लावलेली फिल्डिंग कोणाचा फायदा होणारा हे येणारा काळा ठरवणार आहे.