कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

तुम्ही तुमचा आमदार बदला सर्व प्रश्न सुटतील -राजन तेली यांची कोपरखळी

तुम्ही तुमचा आमदार बदला सर्व प्रश्न सुटतील -राजन तेली यांची कोपरखळी

सिंधुदुर्ग च्या विकासासाठी ३००००कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध

सावंतवाडी भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या निधीचे माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, या पत्रकार परिषदेत सावंतवाडीतील आरोग्य सेवाबत अनेक तक्रारी पत्रकारांनी मांडल्यावर तुम्ही तुमचा आमदार बदला समस्याही सुटतील असा टोला आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला व आपण या मतदारसंघाचा प्रमुख प्रबळ दावेदार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला विविध माध्यमातून तीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारी मंत्र्यांचे आभार मानण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात साधी तापाची गोळी व इंजेक्शन मिळत नाही तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कशासाठी सुरुवातीला प्राथमिक सुविधा निर्माण करा अशी मागणी केली, यावर राजन तेली यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या .
प्रश्नांची सरबत्ती होत असल्याचे दिसताच हे प्रश्न सुटावेत असे तुमची मनापासून ची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा आमदार बदला असा टोलाही जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला, आंबोली कबुलायतदार प्रश्न सुटायचा असेल तर त्यात श्रेय वादाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असेही तेली म्हणाले,तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बाबतही विरोधासाठी विरोध न करता एकत्र येऊन हा प्रश्न प सोडवावा असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!