आणखीसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रोहिणी सोळंके यांनी पदभार स्वीकारला..

यापूर्वीचे उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांची रत्नागिरी येथे बदली..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.११: उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डाॅ. रोहिणी सोळंके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्या हजर झाल्या आहेत. त्यांची अलिकडेच येथे नियुक्तीचे आदेश झाले होते. तर यापूर्वीचे अधिकारी शिवाजी मुळीक यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे.

दरम्यान, डॉ. सोळंके यांनी वैद्यकीय क्षेत्रात रुजी धरून सर्वप्रथम एमबीबीएस ही पदवी संपादन केली आहे. पोलीस सेवेत सेवा बजावण्याच्या आकांक्षा धरून खडतर प्रशिक्षण प्रयत्नानंतर त्यांनी आयपीएस परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाल्या. तेथे काही काळ सेवा पूर्ण करून त्या अकोला येथील बाळापूर उपविभागीय कार्यालयात त्यांनी उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे सांभाळली. या तीन वर्षांच्या संपूर्ण प्रशिक्षण व सेवा काळानंतर त्यांनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

गेले काही दिवस सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. लॉकडाउन पूर्वी चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरू होते. अवैध दारू मटका जुगार या धंद्यानाही लॉकडाउनच्या काळामध्ये उत आला आहे. मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची अवैद्य दारू वाहतूक आणि विक्री सुरू आहे.  येथील पोलीस ठाण्यात गतवर्षी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी महिला पोलीस म्हणून चांगली कामगिरी बजावली मात्र गेली काही वर्षे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी पदी महिला पोलीस अधिकारी नियुक्त झाल्या नव्हत्या. उपविभागीय पोलिस अधीक्षक सोळंके यांच्या नियुक्तीने  सावंतवाडी  कुडाळ वेंगुर्ले दोडामार्ग तालुक्यात छुप्या पद्धतीने  सुरू असलेल्या अवैध धंदे आणि महिलांवरील अत्याचारावर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यापूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी आपल्या चांगल्या कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर रत्नागिरीहून शिवाजी मुळीक यांनी तीन वर्षाहून अधिक काळ या पदावर सेवा बजावली. त्यानंतर श्री. मुळीक यांना रत्‍नागिरी येथे बढती मिळाल्यानंतर त्यांच्या जागेवर डॉ. सोळंके ह्या रुजू झाल्या आहेत.

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!