कुडाळकोकण

भडगावात तरुणाला दांड्याने मारहाण

 

खैराचे झाड तोडल्याचा राग

कुडाळ, दि.२३:- वहिवाटीमधील खैराचे झाड तोडल्याच्या रागातून स्वप्नील बाबी कंदम (३०, रा. भडगाव बु.- सिद्धार्थनगर) यांना शिवीगाळ व दांड्याने मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाले. याप्रकरणी चुलत भाऊ विनय लक्ष्मणं कदम सूर्यकांत कदम (रा. भडगाव बु.) या दोघांवर कुडाळ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती.

 

याबाबतची फिर्याद स्वप्नील कदम यांनी पोलिसात दिली. ते आपल्या घरी असताना त्यांचा भाऊ सिद्धार्थ घराला लागून असलेल्या वहिवाटीत असणाऱ्या जागेतील खैराचे झाड तोडत होता. तेव्हा स्वप्नील यांचा चुलतभाऊ विनय कदम तेथे आला व सिद्धार्थ याला शिवीगाळ करू लागला. ते खैराचे झाड आमच्या वहिवाटीत आहे, असे म्हणू लागला.

ते पाहून स्वप्नील हेही त्या ठिकाणी आले. तू माझ्या भावाला शिवीगाळ का करतोस?, अशी विचारणा त्यांनी विनयला केली. तेव्हा तो स्वप्नील यांनाही शिविगाळ करू लागला. नंतर विनयने आपले काका सूर्यकांत यांना बोलावून घेतले. विरुद्ध त्यांनीही या दोघांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच सूर्यकांत याने तेथील दाखल लाकडी दांडा घेऊन स्वप्नील यांच्या डाव्या बाजूला डोक्यावर मारून दुखापत केली. त्यानंतर स्वप्नील बेशुद्ध पडले.

त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे व नंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार केल्यानंतर आज त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विनय कदम व सूर्यकांत कदम या दोघांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार राजेश कोळंबकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!