कोकण

निवृत्ती वेतनातील दिरंगाई थांबवा!

 

जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक आदी निवृत्तांना सप्टेंबर २०२२ पासून निवृत्ती वेतन दुसऱ्यां महिन्याच्या ३० तारखेपर्यंत अदा केले जात आहे. नुकतीच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्था सावंतवाडी यांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांची भेट घेतली. निवेदनात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र राज्यातून केवळ सिंधुदुर्ग जिल्हातील निवृत्ती वेतनधारकांवर ही वेळ का यावी? निवेदन देईपर्यंत निवृत्ती वेतन बँकेमध्ये कदाचित जमाही झालेले असेल. मात्र, प्रशासन प्रमुख म्हणून आपण काही निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहात काय? कार्यक्षमता न अजमावता द्वितीय तसेच तृतीय श्रेणीतील अधिकारी पदोन्नतीने भरून प्रशासन त्यांच्या ताब्यात दिल्याने अशा समस्या निर्माण होण्यास तेच जबाबदार नाहीत का? जिल्हा प्रशासन भरकटलेल्या जहाजासारखे दिसत आहे. निवृत्ती वेतन वेळीच मिळण्याची व्यवस्था करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने जे-जे उपाय आहेत ते करावे लागतील, असा इशाराही देण्यात आला. संस्थेचे 1. अध्यक्ष मधुकर आईर, उपाध्यक्ष अरविंद नेमळेकर, सदस्य द. मा. गवस, महादेव बांदेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!