कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

डॉ. दुर्भाटकर यांच्यासह चार डॉक्टरांच्या बदल्या रद्द

डॉ. दुर्भाटकर यांच्यासह चार डॉक्टरांच्या बदल्या रद्द

कणकवली

ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या जिल्ह्यातील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा जिल्ह्यातच नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी आमदार नीतेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आहेत. आले एकीकडे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असताना जिल्ह्यात काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या होत्या. याबाबत आमदार राणे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधत या बदल्या रद्द करण्याच्या अनुषंगाने कार्यवाहीची मागणी केली होती.
यात ग्रामीण रुग्णालय कुडाळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वालावलकर यांना वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे बदली देण्यात आली होती. त्यात बदल करून आतात्यांना वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग व प्रसुत तज्ञ, स्त्री रुग्णालय ‘सिंधुदुर्ग येथे नियुक्ती देण्यात आली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना आता पुन्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालय ओरोस येथील डॉ. बाळासाहेब जोशी यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बदली देण्यात आली होती. त्यांना नेत्रशल्यचिकित्सक म्हणून पुन्हा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे नियुक्ती देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुलीचे वैद्यकीय अधिकारी व प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांना ग्रामीण रुग्णालय वाडा जि. पालघर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यात आता बदल करून त्यांना वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पेंडूर-कट्टा येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!