कोकणमनोरंजनमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्योत्सव आजपासून

मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्योत्सव आजपासून

कणकवली

येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेतर्फे नाट्योत्सव आयोजित करण्याचे यंदाचे ३० वे वर्ष असून या नाट्योत्सवात सहा दिवसांत नऊ नाटके सादर होणार आहेत.

नाटकांची रुपरेषा पुढीलप्रमाणे : २३ फ़ेब्रुवारी सायंकाळी ६.३० वा. ‘लव्ह यू’ (तमाशा थिएटर, पुणे), लेखक-किस्तो सागर, अनुवाद मृण्मयी शिवपूरकर यांचा, तर दिग्दर्शन सपन शरण यांनी केले आहे. यात भूमिका शिवराज वायचळ व पर्ण पेठे यांच्या आहेत. रात्री १० वा. ‘अडलंय का..?’ (नाटक कंपनी, पुणे), मूळ लेखक चार्ल्स लेविन्स्की, भाषांतर शौनक चांदोरकर यांचे, तर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी यांचे आहे. यात अतुलपेठे व पर्ण पेठे हे कलाकार आहेत.२५ फेब्रुवारीला राखाडी स्टुडिओ, पुणे यांची दोन नाटके होणार आहेत. सायंकाळी ७ वा. ‘प्रस्थान’ उर्फ ‘एक्झिट’ लेखक मकरंद साठे, दिग्दर्शक आलोक राजवाडे आहेत. यात सुहिता थत्ते, गजानन परांजपे, तुषार टेंगले यांच्या भूमिका आहेत. रात्री १० वा. ‘उच्छाद’ मूळ लेखक यास्मिाना रेझा, अनुवाद निरंजन पेडणेकर यांचा, तर दिग्दर्शन अनुपम बर्वे यांचे आहे. यात सायली फाटक, तन्वी कुलकर्णी, सिद्धेश धुरी, निरंजन पेडणेकर यांच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!