कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 साटेली – भेडशी राऊळ महाराज स्मारक मंदिर ते पिकुळा तिठा रस्ता खड्डेमय

 

*🟥 येत्या दहा दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास पिकुळे सरपंच आपा गवस करणार ग्रामस्थांना घेऊन उपोषण*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२३:-* साटेली-भेडशी राऊळ महाराज मंदिर ते पिकुळे तिठा हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे.या रस्त्यावरुन वाहने हाकताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागत आहे.अनेक वेळा या मार्गावर अपघातही झाले आहे. मात्र याची कल्पना संबंधित विभागाला दिली असता संबंधित विभागाकडून त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.तसेच त्याठिकाणी पुन्हा अपघात घडल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील असे यावेळी सांगण्यात आले.त्यामुळे येत्या दहा दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पिकुळे सरपंच आपा गवस व स्थानिक ग्रामस्थ यांच्यावतीने उपोषण केले जाईल असे यावेळी त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!