🟥शेतकऱ्यांनी गतवैभव प्राप्त करण्यासाठी शेती सोबतच पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे ; सावंतवाडी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे
*🟥 माऊली बादेकर दुग्ध संस्था आणि गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धव्यवसाय शेतकरी प्रशिक्षण संपन्न..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी दि.२२:-* सोनुर्ली,निरवडे व न्हावेली येथील दुग्ध व्यवसायायीक शेतकऱ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आर्थिक सहाय्यातून लवकरच हरियाणा मुरा जातीच्या दुधाळ ३० म्हैशी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी बोलताना सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे म्हणाले, शेतकऱ्यांनी गतवैभव प्राप्त करण्यासाठी शेती सोबतच पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे. त्यातून आर्थिक प्रगती साध्य होईल. योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर हा व्यवसाय झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, अण्णासाहेब पाटील महामंडळ कायम तत्पर असतील. शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला कायमच मार्गदर्शन मिळाले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत राहू.
सोनुर्ली येथील माऊली बादेकर दुग्ध संस्था आणि गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धव्यवसाय शेतकरी प्रशिक्षण सोनुर्ली येथे घेण्यात आले. यावेळी प्रमोद गावडे बोलत होते. सोनुर्ली, न्हावेली व निरवडे भागातील ५० शेतकरी यावेळी उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाच्या वतीने सागर किल्लेदार व भगवान गावडे यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच लवकरच हरियाणा मध्ये जाऊन हरियाणा मोरा जातीच्या म्हैशी आणण्यासाठी शेतकरी जातील असे यावेळी सांगण्यात आले.
माजी सभापती सौ. प्रियंका गावडे, खरेदी विक्री संघाचे संचालक नारायण हिराप, सोनुर्ली येथील नव संजीवनी दुग्ध संस्थेचे सुनील गाड, रवींद्र धाऊसकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, इब्राहम करोल ,राकेश पांढरे, नंदकिशोर गावकर, दीपलक्ष्मी गावकर, निलेश मोर्ये, मकरंद पेडणेकर, सुनील गावडे, अविनाश गाड, महादेव गावकर आणि शेतकरी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या आर्थिक सहाय्याने परराज्यातील हरियाणा येथे दुधाळ हरियाणा मुरा जातीच्या म्हैशी खरेदीसाठी शेतकरी जाणार आहेत. याबाबत सागर किल्लेदार यांनी माहिती दिली. यावेळी माजी सभापती प्रियंका गावडे, नारायण हिराप व मान्यवरांनी शंकांचे निरसन केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

