इमारत बांधकाम कामगारांना संरक्षण किट वाटपासंदर्भात कामगार अधिकारी कार्यालयात नियोजन बैठक संपन्न..
▪️येत्या शनिवारपासून तालुकानिहाय टप्प्याटप्प्याने वाटप प्रक्रिया सुरु होणार; बैठकीत झाले एकमत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१८: इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुरक्षा किट वितरणाच्या नियोजनासंदर्भात दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी मनसे शिष्टमंडळ व वितरक बाह्यस्त कंत्राटदार संस्था व्यवस्थापक यांची सरकारी कामगार अधिकारी कार्यालय नियोजनपर बैठक घेण्यात आली.
काही दिवसापूर्वी ओरोस, कणकवली येथील शिबिरात सुरक्षा किट वितरण करताना कंत्राटदार संस्थेच्या नियोजन शून्य कारभारामुळे कामगारांना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असून वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारीमूळे मनसेने वितरण शिबिर बंद पाडले होते व जोपर्यंत वाटपसंबंधी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करून कामगारांना सुलभ पद्धतीने वितरण होत नाही, तोपर्यंत वाटप थांबवावे अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात मनसेचे शिष्टमंडळ कंत्राटदार व्यवस्थापक लवेकर व दुकाने वा आस्थापना निरीक्षक सुविधाकार श्री कुबल यांची संयुक्त नियोजन बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत कामगारांना सुरक्षा किट वाटप प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावे अशी आग्रही भूमिका मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मांडली. शिवाय कामगारांची होणारी गर्दी सुलभ पद्धतीने हाताळण्यासाठी शिबीर ठिकाणी कर्मचारी मनुष्यबळ वाढवण्यात यावे, तसेच कीट वाटप करताना महिला कामगारांसाठी व पुरुष कामगारांसाठी स्वतंत्र वाटप यंत्रणा कार्यान्वित करावी, तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करत असताना किमान तीन ते चार दिवस अगोदर वर्तमानपत्रांमधून प्रसिद्धी देण्यात यावी, त्या तालुक्यातील कामगारांना त्याच तालुक्याच्या ठिकाणी किट सुपूर्द करावे अशा प्रकारच्या सूचना मनसेच्या शिष्टमंडळाने मांडल्या.
कंत्राटदार संस्था व्यवस्थापक व सुविधाकार श्री. कुबल यांनी मनसेच्या रास्त सूचनानुसार योग्य पद्धतीने वाटप प्रक्रिया राबविण्याचे मान्य केले.
त्या अनुषंगाने येत्या शनिवारपासून तालुकानिहाय टप्प्याटप्प्याने शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले. त्यानुसार शनिवार व रविवार रोजी कुडाळ वासुदेवानंद सरस्वती सभागृहात वाटप शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.टप्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. कुबल यानी सांगितले.
यावेळी मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष कुणाल किनळेकर, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, कामगार प्रतिनिधी सतीश कदम व पत्रकार उपस्थित होते.
जिल्ह्यातील कामगारांना सुरक्षा किट वाटप या संबंधात कोणत्याही समस्या वा कृती आढळून आल्यास वा अडचणी आल्यास कामगारांनी मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मीडियाशी बोलताना केले.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

