रत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

वेलदुर मधील मच्छीमारांच्या अडचणींवर आ. भास्करराव जाधव यांनी काढला मार्ग..

▪️वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जेटीच्या कामाची पाहणी करून निर्णय; मच्छीमारांना दिलासा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.१८: तालुक्यातील वेलदुर येथे ७.३० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पर्यटन जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांना त्यांच्या बोटी होड्या किनाऱ्यावर आणणे अडचणीचे ठरणार होते. यावर आमदार भास्करराव जाधव यांनी आज संबंधित सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक मच्छिमारांना सोयीचे होईल अशाप्रकारे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.  त्यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वेलदूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबा भालेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी व मच्छीमार प्रतिनिधी यांनी मंगळवारी (दिनांक १७) आमदार श्री जाधव यांची चिपळूण येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन प्रस्तावित जेटीमुळे स्थानिक मच्छीमारांपुढे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली होती.

त्यावर आमदार श्री जाधव यांनी तिथूनच संबंधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना दुसऱ्याच दिवशी सकाळी वेलदुर जेटीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे आज सकाळी आमदार श्री जाधव वेलदुर येथे पोहोचले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता श्री. मोहिते, उप अभियंता श्री. मंजुळे, मत्स्य विभागाचे निरीक्षक श्री. देसाई, या कामाच्या सल्लागार एजन्सीचे श्री. दाभोळकर यांच्यासह अन्य स्थानिक अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते.

प्रस्तावित शेतीमुळे स्थानिक मच्छिमारांना होड्या उभ्या करणे अडचणीचे ठरणार असल्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार श्री. जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना अधिकाऱ्यांची सल्लामसलत केली आणि तोडगा काढताना जेटीचे पिलर उभे राहणार आहेत त्याच्या बाहेर अडीच मीटरने रॅम्प वाढविण्याचा आणि २४ मीटर पर्यंत जेटी ठेवून पुढे ४० मीटरचा उतार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आणि त्यांनीही त्या तत्काळ मान्य केल्या.

आमदार श्री जाधव यांनी मच्छीमारांच्या अडचणीवर अवघ्या एका दिवसात मार्ग काढला. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा निर्णय झाल्यानंतर गावच्या राधाकृष्ण मंदिरामध्ये वेलदूर सहकारी मच्छी व्यवसाय संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने आमदार श्री. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी आता पक्ष कुठला हे न पाहता आपलं काम कोण करतो हे पाहून विकास करणाऱ्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका लोकांनी घेतली पाहिजे, असे आवाहन केले.

यावेळी गावचे सरपंच श्री डांगे, अंबाजी दाभोळकर, संदीप वनकर, नंदा रोहिलकर, संतोष माने, जयवंत पडवळ, प्रवीण पड्याळ आदी उपस्थित होते.

आ. श्री जाधव यांची दूरदृष्टी
मुंबई ते गोवा अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र मुंबई ते गोवा दरम्यान या वाहतुकीला कुठेही थांबा देण्यात आला नव्हता. परंतु या सेवेचा फायदा आपल्या जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाचा झाला पाहिजे यासाठी आमदार भास्करराव जाधव यांनी पाठपुरावा केला आणि गुहागरला थांबा मंजूर करून घेतला. त्यासाठी गुहागर तालुक्यातील वेलदूर हे ठिकाण सोयीचे असल्याने तिथे ७.३० कोटींची जेटी मंजूर करून घेतली. त्याबरोबरच प्रवाशांसाठी वेटिंग रूम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, उपहारगृह आणि तिकीट काउंटर असलेल्या इमारतीचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. त्याचीही पाहणीदेखील आज त्यांनी केली. आमदार श्री. जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे ही सेवा उपलब्ध होत असून त्याचा फायदा गुहागरसह आजूबाजूच्या तालुक्यानाही निश्चितपणे होणार आहे. पर्यटनामध्ये वाढ होऊन, रोजगार निर्मितीसुध्दा होऊन त्याचा सर्वाधिक फायदा गुहागर तालुक्याला होणार आहे.

*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*

*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*

*_🤷🏻‍♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*

*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..

_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_

*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!