कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी आज काॅग्रेसची एल आय सी व स्टेट बँक समोर निर्दशने

सिंधुदुर्गनगरी ता १०
अदानी समूहाने केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात तसेच अदानी समूहाला पाठीशी घालणाऱ्या केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी व स्टेट बँकेच्या शाखेसमोर तीव्र निदर्शने केली.

केंद्र सरकारने अदानी समूहाला दिलेल्या ८० हजार कोटी कर्जाला वाली कोण ? ना खाऊंगा ना खाने दूंगा- सबकुछ बस अदानी को दूंगा, अशी भूमिका असणारे सरकार बरखास्त करा. या मागणीसाठी आणि केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सिंधुदुर्गनगरी येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर अदाणी उद्योग समूहाने केलेल्या घोटाळ्याच्या विरोधात जिल्हा मुख्यालयातील एल. आय. सी. व स्टेट बॅंकेच्या शाखेंसमोर आज निदर्शने केली. तसेच
अदाणी समूहाला पाठीशी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,प्रकाश जैतापकर, श्रीकृष्ण तळवडेकर, किरण टेम्बुलकर, दिलीप नार्वेकर,देवानंद लुड़बे,प्रदिप मांजरेकर,रविंद्र म्हपसेकर, विजय प्रभु, अजिंक्य गावडे, आदिसह मोठ्या संखेने काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!