🟥 पाडलोस येथील चवळी पिकासाठी गेले तीन महिने घेतलेली मेहनत गव्यारेड्यांनी केली एका रात्रीत फस्त..
*🟥 वनविभाग गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ; पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०३:-* निसर्गाच्या लहरीपणाला नेहमी सामोरे जात चवळी पिकासाठी गेले तीन महिने घेतलेली मेहनत एका रात्रीत गव्या रेड्यांनी फस्त केली. काढणीयोग्य झालेले चवळी पीक जागेवर उभे दिसत नसल्याचे विदारक दृष्य पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले.त्यामुळे वनविभाग गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने शेतात राबायचे तरी कशाला? असा आर्त सवाल पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी उपस्थित केला.
गेल्या तीन महिन्यांची मेहनत फळाला आल्याचा आनंद वाटत असतांनाच पाडलोस केणीवाडा येथे बुधवारी रात्री गव्यांचा कळप चवळी पिकात घुसला.एका रात्री रानगव्यांनी चवळी पिकाचे नुकसान केले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा म्हणून आम्ही दरवर्षी रब्बी पिकांसह भाजीपाला लागवड करतो. रात्री फटाके व विजेरीच्या साहाय्याने काही वेळ पिकाचे संरक्षण करतो. परंतु वनविभागाच्या अपयशामुळे मेहनत वाया जातेय याचे दु:ख वाटते. नांगरणी, पिकाची किंमत, मजुरी याची सांगड घालत दोन ते तीन हजार उत्पन्न देणारी चवळी तयार झाली होती.गवे शेतात फिरल्यानंतर बहुतांश पीक त्यांच्या मोठ्या पायाखाली तुडवले गेले. त्यामुळे आमच्या हाती पिकातील एक दाणा येताना अवघड झाले आहे. झालेल्या नुकसानिमुळे आमचे आर्थिक गणित कोलमडून गेल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
गव्यांचा बंदोबस्त करणे वनविभागाला शक्य नसल्याने रानगव्यांकडू रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. भरपाईच्या जाचक निकषांमुळे आम्हाला तुमची भरपाई नको परंतु प्रत्यक्ष पाहणी करत उर्वरीत पिकाचे संरक्षण कसे केले जाईल यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*
*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*
_*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_
_🤩कर्ज मर्यादा_
_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_
_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_
⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत
💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज
_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_
_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_
*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*
_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._
*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*
*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*
वसंत प्लाझा, सावंतवाडी
_*शाखा सावंतवाडी*_
📞02363273889
_*शाखा वेंगुर्ला*_
📞02366262953
_*शखा कणकवली*_
📞02367233922
_*शाखा कुडाळ*_
📞02362221559
_*शाखा शिरोडा*_
📞02366227439
_*शाखा मालवण*_
📞02365252782
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

