आरोस गावात नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ त्रस्त
आरोस गावात नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ त्रस्त
सावंतवाडी
आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रबंधक रविकिरण जन्नू यांना घेराव घालत वारंवार होणाऱ्या रेंजच्या समस्येविषयी चर्चा केली. तर काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे जन्नू यांनी सांगितले.
तालुक्यातील अन्य गावातील रेंजसंदर्भातही चर्चा करण्यात आली. तसेच काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगारासंदर्भातही धडक दिली होती.
त्यानंतर एका ठेकेदाराने संपूर्ण पगार कामगारांचा घातल्याची माहितीही जन्नू यांनी दिली. तसेच गावातील इंटरनेटसंदर्भातही अनेक समस्या असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर इंटरनेट व रेंज सुरळीत ठेवा. अन्यथा गावातील लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, माजी संपर्क अध्यक्ष महेश परब, कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, बाळा बहिरे, मिलिंद सावंत, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.

