कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या युवकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या युवकावर गुन्हा

कणकवली

१७ वर्षीय मुलीला मारहाण केल्याने २५ वर्षीय युवकावर विनयभंगासह बालकांच्या लैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी सोमवारी दुपारी १२.३० वा. सुमारास कॉलेजमधून घरी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या युवकाने युवतीला ‘माझ्यासोबत बोल’ असे सांगितले. तिने नकार दिल्याने युवकाने तिच्या कानाखाली मारले, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार युवकावर भा.दं.वि. कलम ३५४, ३२३. व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!