कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पाडलोसमध्ये देवाच्या दिव्याच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास- रॉकेलही बंद,वीजही गायब*

*🛑 पाडलोसमध्ये देवाच्या दिव्याच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास- रॉकेलही बंद,वीजही गायब*

*🛑 “आम्ही अभ्यास करायचा तरी कसा?” विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०८:-* पाडलोस गावात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे जनजीवन अंधारात गेले आहे. सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, देवासमोर लावल्या जाणाऱ्या छोट्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.डिजिटल शिक्षण,गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या घोषणा करणाऱ्या सरकारसमोर ही परिस्थिती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचायला सायंकाळचे सहा वाजतात.त्यानंतर अंधार पडतो; मात्र गावात वीज नसल्याने अभ्यास करणे अशक्य बनते.सरकारने काही वर्षांपूर्वी रॉकेलचा पुरवठा बंद केला. आता वीजही चार-चार दिवस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी नेमका कोणता पर्याय वापरायचा,असा संतप्त सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, गृहपाठ पूर्ण करणारी लहान मुले आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाईल चार्ज होत नसल्याने ऑनलाइन अभ्यास,शैक्षणिक माहिती आणि शिक्षकांशी संपर्कही तुटत आहे.वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
*अंधाराविरुद्धचा संघर्ष तीव्र*
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न असून,संबंधित यंत्रणा आणि सरकारने याची तातडीने दखल घेऊन पाडलोससह परिसरातील वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अन्यथा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा अंधाराविरुद्धचा संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!