माजगाव मध्ये प्रभाग क्र.२ मध्ये सदस्य पदासाठी “काटे की टक्कर”
*अपक्ष उमेदवार निखिल मोरजकर यांनी विरोधकांची केली हवा टाईट*
सावंतवाडी, दि.१६:- माजगाव ग्रामपंचायत निवडणुक अगदी टाईट झाली आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात लढत होत आहे. पण प्रभाग क्रमांक २ मध्ये सदस्य पदासाठी काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न अजून सोडवला गेला नाही त्यामुळे येथील जनता राजकीय पक्षाबाबत नाराजी असून ह्यावेळी वेगळा निर्णय म्हणून अपक्ष उमेदवार निखिल मोरजकर यांना मते देतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.कारण तस बघितलं तर ह्याआधी शिवसेनेची ग्रामपंचायत होती आणि जि. प. आणि पं. स. ही भाजपा कडे होती मात्र कोणीच हा प्रश्न निकाली काढला नाही.निवडणूक आली की फक्त दिशाभूल केली जाते त्यामुळे स्थानिक सदस्य पदी निखिल मोरजकर यांना मते मिळतील तसेच त्यांना जनता युवा नेतृत्व म्हणून पाहते आणि त्यांच्याकडे नवीन चेहरा म्हणून नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील असा अंदाज ग्रामस्थामध्ये वर्तवला जात आहे.

