माजगाव सरपंच पदी डॉ.सौ.अर्चना सावंत आणि उपसरपंच पदी संतोष विष्णू वेजरे यांची निवड
आज स्विकारला पदभार;सर्वपक्षीय लोकांनी सरपंच उपसरपंच यांना दिल्या शुभेच्छा
सावंतवाडी, दि.३०:- माजगाव सरपंच पदी डॉ.सौ.अर्चना सावंत आणि उपसरपंच पदी संतोष विष्णू वेजरे यांची निवड करण्यात आली. आज सरपंच आणि उपसरपंच यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी गाव प्रमुख आर के सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, चंद्रकांत सावंत गुरुजी, नारायण सावंत ,संदीप सावंत,सी. ए. लक्ष्मण नाईक, एड. सचिन गावडे,अजय सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व पक्षीय लोकांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन केले.

