कृषिशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी..

▪️ग्राहक पंचायतची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴सिंधुदुर्ग,दि.१२: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खंडाने शेती करण्यात येत आहे. यावर्षी अवकाळी व परतीच्या पावसामुळे या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्ष-जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात याचा सर्वे होऊन सर्व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी. वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खंडाने जमिनी घेऊन त्यामध्ये भात शेती केली जाते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या नावे जमीन नसल्यामुळे त्या जमिनीत केलेली भात शेती वाया गेली तरी त्यांना भरपाई मिळत नाही. जमीन मालकांना भरपाई मिळते. एक तर खंड द्यायचा आणि दुसरीकडे पावसाने सर्व हिरावून घेतले तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. त्यामुळे खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही या निवेदनाव्दारे आपणाकडे करीत आहोत.

आम्ही केलेल्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन योग्य कार्यवाही करावी अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष श्री.संदेश तुळसणकर व वैभववाडी तालुका संघटक श्री.शंकर स्वामी यांनी केली आहे.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!