वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडी पोस्ट कार्यालयात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे होणारी ग्राहकांची गैरसोय दूर करावी..

▪️जिल्हा डाक अधीक्षक यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴सिंधुदुर्ग,दि.०३: जिल्ह्यातील वैभववाडी तालुका पोस्ट कार्यालयात गेले काही महिने पुरेसा व नियमित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेकडे तसेच वैभववाडी तालुका शाखेकडे आलेल्या आहेत. पुरेसा व नियमित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी डाक अधीक्षक, पोस्ट आॉफीस ओरस, सिंधुदुर्ग यांच्याकडे  ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने करण्यात आली आहे.

मुळात अपुरा कर्मचारी पुरवठा असताना येथील कर्मचारी दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये पाठवले जातात. याबाबत आम्ही आपल्या कार्यालयाची पत्रव्यवहार करून  पुरेसा कर्मचारी पुरवठा करावा व ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी विनंती केलेली आहे. तसेच आठ दिवसापूर्वी फोनवरून  येथील वस्तुस्थितीची कल्पना  दिली होती. दोन-तीन दिवस बदलीवर पाठवलेला कर्मचारी आजच हजर झाल्याचे समजते. वैभववाडी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्राहकांना विचार करता पुरेसा कर्मचारी वर्ग अपेक्षित असताना आपण याकडे दुर्लक्ष करीत आहात. वैभववाडी पोस्ट कार्यालयात पुरेसा व नियमित कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने येथील सर्वसामान्य ग्राहकांची होणारी  गैरसोय दूर करावी अशी विनंती करीत आहोत.

भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाज शरणवृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत.

सदर विनंती अर्ज मेलद्वारे पाठवला असून या मेलची प्रत जनरल पोस्ट मास्तर, डिव्हिजन गोवा यांना पाठवली आहे. आम्ही केलेल्या विनंती अर्जावर योग्य कार्यवाही करावी. तसेच आपण केलेल्या कार्यवाही बाबत पत्रोत्तर व्हावे, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर, वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी यांनी केली आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!