करियरसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचा निकाल जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.११: दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात १० वर्षापर्यंतच्या गटात दुर्वा जयसिंग घाडी (वेताळ बांबर्डे – कुडाळ) – प्रथम, शमिका सचिन चिपकर (कुडाळ – सिंधुदुर्ग) – द्वितीय, भक्ती संजय पवार (पनवेल), ११ ते २० वर्ष वयोगटात सोहन प्रविणकुमार अहिरे (साक्री – धुळे) – प्रथम, सई योगेश आनंदराव (जुन्नर – पुणे) – द्वितीय, भार्गवी विजय पाटील (पेण – रायगड) – तृतीय, खुल्या गटामध्ये शरद निळकंठ यादव (वाई-सातारा) – प्रथम,  सुनिल मानसिंग यादव (कुसवडे – सातारा) – द्वितीय, अमृत प्रविण धामापूरकर (माळगाव बागायत, मालवण – सिंधुदुर्ग) – तृतीय, क्रमांक मिळवला.

या स्पर्धेमध्ये कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुतार तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे उपाध्यक्ष लिनेश धुरी, सरचिटणीस सुनील करडे, संपर्कप्रमुख युवराज राठोड यांनी व्हिडीओ एडिटिंग काम केले तसेच इतर सदस्यांनी नियोजन केले होते. अशोक प्रकाश मेस्त्री यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. ही स्पर्धा ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद अर्जुन शंकर पेंडूरकर यांनी काम बघितले. यशस्वी स्पर्धकांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत अभिनंदन करण्यात आले आहे.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!