सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय झालंय भ्रष्टाचाराचा अड्डा; सामाजिक कार्यकर्ते प्रितम मोर्ये
▪️परिवहन कार्यालयात एजंट व कर्मचाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे; शासनाचे करोडो रुपये गिळंकृत
▪️परिवहनच्या भ्रष्टाचाराविरोधात प्रितम मोर्ये यांचे उद्या ओरोस येथे उपोषण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्ग,दि.११: जिल्हा परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात कणकवली तालुक्यातील नागवे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितम मोर्ये यांनी जिल्हा परिवहन कार्यालय ओरोस यांना लेखी पत्राद्वारे उद्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हा परिवहन कार्यालय ओरोस येथे उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे आवाहन देखील केले आहे
सामाजिक कार्यकर्ते प्रितम मोर्ये यांनी प्रसिद्धीपत्रात असे म्हटले आहे की, मी श्री. प्रितम जयप्रकाश मोर्ये कणकवली तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ता असून मी एका सामान्य रिक्षाचालकाचा मुलगा आहे. त्याच कारणाने कोरोना काळात लॉकडाऊन मुळे रिक्षा व्यावसायिक व वाहतूकदांरावर आलेल्या आर्थिक संकटाची मला जाणीव आहे. याच भावनेतून या व्यावसायिकांना आपल्या परीने काही मदत होईल याचे भान ठेवून परिवहन सेवा पैकी फिटनेस व इतर कामांकरिता लोकांना निस्वार्थीपणे व नी:शुल्क मदत करीत आहे. सदर व्यवसायिकांना मदत करताना परिवहन कार्यालयातील काही कर्मचारी व एजंट विघ्न आणीत आहेत. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करून काहीही दखल घेतली गेली नाही.
परिवहन कार्यालयात एजंट व कर्मचारी यांचे आर्थिक साटेलोटे असल्याने कामासाठी थेट गेलेल्या व्यक्तीची अडवणूक केली जात आहे. सदर कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा असून एजंट कर्मचारी व अधिकारी यांनी मिळून शासनाचे करोडो रुपये गिळंकृत केले. परंतु याचा नाहक आर्थिक भुर्दंड वाहनधारकांना भोगावा लागत आहे.
रिक्षाचालकांचे परमिट जाणीवपूर्वक नूतनीकरण करण्यात अडचणी निर्माण करून त्यातून आर्थिक लाभ मिळवण्याचे षडयंत्र एजंट व परिवहन कार्यालयातील कर्मचारी करीत आहेत. रिक्षा स्क्रॉप विषयात देखील असेच प्रकार घडत आहेत. रिक्षा क्रॉप करण्याकरिता रिक्षा व्यवसायिकांना जाणीवपूर्वक ओरोस येथे बोलावून नजीकच्या स्क्रॅप मर्चंट कडे स्क्रॅप करून कवडीमोलात गाडीची विक्री करण्यात भाग पडले जाते. एजंट कडे काम दिल्यास कोणीही अधिकारी उपस्थित नसताना चढ्या दराने गाडीची स्क्रॅप ऑर्डर केली जाते. हा अनुभव सध्या मला येत आहे.
परिवहन कार्यालयात सामान्य माणसाची पिळवणूक होत असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिक थेट न जाता एजंटमार्फत दामदुप्पट पैसे देऊन काम करून घेताना दिसत आहेत. असा अनुभव तुम्हा-आम्हा सर्वांना येत आहे. हे रॅकेट जर मोडून काढायचे असेल तर रस्त्यावरची लढाई अनिवार्य आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा असेल तर एजंट मुक्ती गरजेची आहे. तसेच भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
याच हेतूने मी दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी परिवहन कार्यालय ओरस येथे उपोषण करणार आहे. तरी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण या लढाईत माझे समर्थन करण्यासाठी ओरोस येथे उपस्थित रहावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रितम मोर्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

