मळेवाड प्रा.आ. केंद्रात रुग्णाला दिलेल्या गोळ्या निकृष्ट; परिसरात खळबळ
▪️रुग्ण कल्याण समिती सदस्य हेमंत मराठे यांच्याकडे तक्रार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अर्जुन मोर्जे
🎴सावंतवाडी,दि.१०: एक रुग्ण तपासणी साठी आज मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला असता तपासणी नंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आरोग्य केंद्रातील औषध भांडारतून घेतल्या. ही घेतलेली औषधे घेण्यासाठी गोळ्यांचे पाकीट फोडले असता त्यातील गोळ्या खराब असल्याचे दिसून आले. यानंतर सदर रुग्णाने रुग्ण कल्याण समिती सदस्य हेमंत मराठे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर सदस्याने केंद्रात जात गोळ्याची पाहणी करून त्याच प्रकारच्या गोळीची स्ट्रिप उघडुन १४ गोळ्या बाहेर काढल्या असता त्यातील १२ गोळ्या खराब आढलल्या. याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश खलिफे यांना मोाईलवर संपर्क साधून सदर प्रकार कथित केला. यावेळी गोळ्यांची पाहणी करून संबंधित पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन खलिफे यांनी दिले.
या खराब झालेल्या गोळ्या बाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर यांना विचारले असता गोळ्यांचे पाकीट वरून चांगले होते. मात्र, आतील गोळ्या खराब असल्याची माहिती दिली.
अशा निकृष्ट दर्जाच्या गोळ्या खाऊन रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा ग्रामस्थांनी उपस्थित प्रश्न केला. रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवा आणि निकृष्ठ दर्जाची औषधे पुरविणाऱ्यावर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा हेमंत मराठे व ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.
डॉ. खलीफे आता आश्वासन दिल्या प्रमाणे चौकशी करून कोणती कारवाई करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

