विविध वाड:मयीन संस्था एकत्र आल्या तर राजकीय शक्तीला आव्हान देऊ शकतात..
▪️ज्येष्ठ कवी व वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचे प्रतिपादन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१०: लेखन हे सत्तेच्या विरोधातील हत्यार ठरू शकते. जगभरातील साहित्याने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे विविध वाड:मयीन संस्था एकत्र आल्या तर त्या राजकीय शक्तीला आव्हान देऊ शकतात असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी सिंधुदुर्ग मराठी कवी लेखक संघटनेच्या राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून केले.
सिंधुदुर्ग मराठी लेखक कवी संघटनेचे राज्यस्तरीय कविसंमेलन श्री चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी समाज, साहित्य, संस्कृती, राजकारण यांचा साहित्याशी कसा घनिष्ठ संबंध आहे यासंदर्भात मांडणी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर मातोंडकर, जिल्हा सचिव सरिता पवार, प्रसिद्ध कवी फेलेक्स डिसोजा (वसई), कवी अनिल साबळे (जुन्नर) कवी प्रा वैभव साटम (ठाणे ) तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. चोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात वाड:मयीन संस्था अनेक कार्यरत आहेत. त्या सर्वांनी एकत्र येऊन एका विचाराने आज काम करण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. अशा वाड:मयीन क्षेत्रातील संस्था एकत्र आल्या तर राजकीय शक्तीला आव्हान ठरू शकतात. साहित्य क्षेत्रातील एकमेकांचा संवाद निकोपपणे वाढत जाणे गरजेचे झाले आहे. साहित्य क्षेत्रातील सौदार्हयपूर्ण देवाणघेवाणीतून जे वातावरण निर्माण होते त्यामुळे राजकीय क्षेत्राला हादरे बसत असतात. याचा विचार आता साहित्य संस्थानी आणि लेखक कवी यांनीही करायला हवा. त्या त्या काळातील अंतर्विरोध लेखक, कवी मांडत असतो. म्हणूनच त्यांच्या लेखणीला महत्त्व असतं. यातूनच तो समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो. देशातील अनेकविध समस्या साहित्याच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून मांडल्या जातात आणि त्याचे दृश्य परिणाम समाज मनावर पडत असतात. आजच्या सिंधुदुर्ग कवी लेखक संघटनेच्या कवी संमेलनामध्ये महत्त्वाची कविता मांडली जाईल आणि सामाजिक विषमतेच्या चर्चा होतील. सिंधुदुर्ग म्हटल्यावर कवितेच्या क्षेत्रातील डॉ वसंत सावंत, आ सो शेवरे अजय कांडर डॉ अनिल धाकू कांबळी, वीरधवल परब, गोविंद काजरेकर, शरयू आसोलकर इत्यादी नावे पुढे येतात तसेच प्रवीण बांदेकर यांनी महत्त्वाच कादंबरी लेखन केलं आहे. या सर्वांनी सिंघुदुर्गचे साहित्य सांस्कृतिक वातावरण समृद्ध केलेले आहे.
श्री मातोंडकर म्हणाले, सिंधुदुर्ग कवी लेखक संघटनेचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. परंतु संघटनेच्या कामाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्गातून लिहित्या नव्या लेखकांना मंच उपलब्ध करून देणे हाच उद्देश असल्याने महाराष्ट्रातील नामवंत कविंबरोबर जिल्ह्यातील कवींना सहभागी करून हा राज्यस्तरीय कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वैभव साटम यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कविसंमेलनात श्री. चोरमारे यांच्या सोबतच फेलेक्स डिसोजा, अनिल साबळे, मधुकर मातोंडकर, नीलम यादव, सुर्यकांत चव्हाण, सरिता पवार, किशोर वालावलकर, मनीषा पाटील, ऍड. मेघना सावंत, प्रमिता तांबे आदींनी समाज साहित्य राजकारण यांचा तळ ढवळून काढणाऱ्या कविता सादर करून महाराष्ट्रातील काव्य रसिकांकडून उत्तम दाद मिळविली. सरिता पवार यांनी आभार मानले.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_