कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या वाहून.. तरी देखील पाटबंधारे विभाग बघेना वळून..

🟥 तिराळी नदिच्याकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेले कित्येक वर्षे जात आहेत वाहून..

🟥 रेडा वाहून गेलेल्या ” त्या ” शेतकऱ्याला पाटबंधारे विभागाकडून अद्याप पर्यंत न्याय नाही..

🟥 निद्रिस्त पाटबंधारे विभागाला जाग येईल का?; शेतकर्‍यांसाठी वेगवेगळ्या उपाय योजना करू असे सांगणारे अधिकारी वर्ग मात्र या विषयावर गप्प..

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS

अचूक बातमी थेट हल्लाही

✍️ उपसंपादक : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०३:– तिलारी नदीच्या नदीपात्रागत असलेल्या गावामध्ये तिलारी नदीचे पात्र वाढून आसपासच्या नदी किनाऱ्यावरील शेतकऱ्यांच्या जमिनी नदीने गिळंकृत केल्या आहेत. मागच्या दोन वर्षांमध्ये तसेच पावसाळ्यात नदीच्या पाणी झोती ने वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जात आहेत.ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात येथील शेतकरी भूमीहीन होणार हे निश्चित आहे.पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चराटे सावंतवाडी, येथे वारंवार संरक्षण भिंतीची मागणी करून देखील तेथील अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत.हे अधिकारी फक्त टेंडर वाटण्यासाठी बसले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या दिड वर्षा पूर्वी आवाडे येथील शेतकरी रमेश नाईक यांचा दिड लाख किमती पर्यंतचा भला मोठा रेडा घोटगे येथून शेता वरून घरी आवाडे येथे येत असताना घोटगे येथील कॉजवे ओलांडत असताना नदिच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्या मुळे रेडा नदित बुडून कॉजवेच्या पाईप मध्ये अडकून गुदमरून मृत्यू झाला होता. त्या नंतर रमेश नाईक हे पाटबंधारे विभागाच्या तिलारी येथील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले होते. तेव्हाचे शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी उपोषण स्थळी भेट देत त्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये ची आर्थिक मदत केली होती. मात्र पाटबंधारे विभागा कडून त्यांना कोणतिही मदत करण्यात आली नव्हती. कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी उपोषण स्थळी भेट देत जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या विभागाचा राहिल तसेच या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येईल असे पत्राद्वारे आश्वासन दिले होते.

मात्र अद्याप पर्यंत पाटबंधारे विभागाने पाठपुरावा केलेल पत्र त्या शेतकऱ्याला मिळाले नाही किंवा कोणतीही आर्थिक मदत त्या शेतकऱ्याला या विभागाने दिली नाही. कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी उपोषण स्थळी येवून भेट देत मोठ-मोठ्या बाता मारण्याचे काम केले. मात्र त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. किंवा वाहून जात असलेल्या जमिनीं बाबत देखील कोणतिही कारवाई त्यांनी केली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कामकाजा बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. व निद्रिस्त पाटबंधारे विभागाने आता तरी जागे व्हावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!