इन्सुली घाटी परिसर झाला कचरामुक्त
इन्सुली घाटी परिसर झाला कचरामुक्त
प्रतिनिधी -: सावंतवाडी
सावंतवाडी आणि बांदा जोडणारा रस्ता इन्सुली घाटीतून जातो. परंतु या घाटीतून जाताना काही जंगलमय भाग लागतो आणि याचाच फायदा घेत काहीजण प्लास्टिक कचरा बॉटल्स तसेच पिशव्या भरून कचरा तेथे टाकतात. त्यामुळे येथे दुर्गंधी येत असते. तसेच या जंगलमय भागात माकडे, कुत्रे या कचऱ्यातून आपल्याला काही खाऊ मिळेल का, हे या पिशव्यांतून शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा कचरा इतस्ततः • विखुरला जातो.
इन्सुली डोबाचीशेळ येथील उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या तरुणांनी घाटीतील तसेच केले.सातजांभळी भागातील सर्व प्लास्टिक कचरा, कचऱ्याने भरलेल्या पिशव्या गोळा करून हा परिसर दुर्गंधीमुक्त तसेच कचरामुक्त केला आहे. यापुढे कोणीही या ठिकाणी कचरा टाकू नये, अशी विनंतीही या मंडळाने केली आहे. कोणाच्याही मार्गदर्शनाविना या तरुणांनी उत्स्फूर्त भाग घेत सामाजिक बांधिलकी जपत हा अनोखा कचरा मुक्त घाटीचा उपक्रम राबवला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. प्रकाश तेंडुलकर यांनी उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

