वैभववाडीत ५० महिलांना शिलाई मशिन्सचे वाटप
वैभववाडीत ५० महिलांना शिलाई मशिन्सचे वाटप
प्रतिनिधी -: वैभववाडी
प्रत्येक महिला ही कुटुंबाचे आधारस्तंभ असते. महिला सक्षम झाल्यास देश ही सक्षम होऊ शकतो. यासाठी महिलांच्या प्रगतीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर यांनी एडगाव येथे बोलताना व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून मानव साधन विकास संस्था अंतर्गत असलेल्या परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गमार्फत वैभववाडी तालुक्यातील प्रशिक्षित असलेल्या ५० महिलांना सोमवारी मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आहे…
प्रभू यांच्या प्रयत्नातून जनशिक्षण सिंधुदुर्गमार्फर्त जिल्ह्यातील एक हजार महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या आहेत. सदर शिलाई मशिन खरेदी करण्यासाठी गोवा विमानतळ प्राधिकरणाने आर्थिक व्यवस्था केलेली आहे. या कार्यक्रमप्रसंगी भाजप उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी किशोर दळवी, जि. प. चे माजी सदस्य सुधीर नकाशे, संजय रावराणे आदी उपस्थित होते.

