गांधील माश्यांच्या हल्ल्यात जखमी वृद्धाचा मृत्यू
गांधील माश्यांच्या हल्ल्यात जखमी वृद्धाचा मृत्यू
प्रतिनिधी -:मालवण
गांधील माश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मालवण तालुक्यातील घुमडे येथील शशिकांत श्रीधर वस्त (७०) यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. वस्त हे शनिवारी मालवण देऊळवाडा येथे नारळ काढण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्यावर चढविला. या हल्ल्यात वस्त हे गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे असा परिवार आहे.

