झोळंबे येथे खुली भजन स्पर्धा
झोळंबे येथे खुली भजन स्पर्धा
ओटवणे : झोळंबे गावातील भजनप्रेमी आणि झोळंबे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० ऑक्टोबरला खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५५५ रुपये, द्वितीय ३३३३ रुपये, तृतीय २२२२ रुपये, तसेच उत्तेजनार्थ ११११ रुपयांची दोन पारितोषिके, स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, गौळण गायक, हार्मोनियम, तबला, पखवाज, कोरस, झांज, श्रोते यांना रोख रकमेची पारितोषिके आहेत. सागर झोळंबेकर ९४०३६४०४५२ यांच्याकडे नावनोंदणी करावी.

