वेंगुर्ले ते पंढरपूर पायी वारी २६ ऑक्टोबरपासून
वेंगुर्ले ते पंढरपूर पायी वारी २६ ऑक्टोबरपासून
वेंगुर्ले : वेंगुर्ले ते पंढरपूरला दरवर्षी निघणारी कार्तिकी पायी वारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी वेंगुर्ले येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर गुरुकुल आश्रमातून निघून प्रत्येक मुक्कामास भेट देत ६ नोव्हेंबर रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. सहभागी होवू इच्छिणाऱ्यानी आपली नावे सद्गुरू नारायण महाराज श्री गोंदेकर गुरुकुल आश्रम येथे द्यावीत, असे आवाहन श्री सद्गुरु चांदेकर महाराज शिष्यगण कमिटीने केले आहे. २६ रोजी सकाळी दुपारी बिपीन वरसकर यांच्या घरी, रात्री सुरेश नाईक मठ यांच्या घरी, २७ रोजी सकाळी कै. चंदुशेठ बाग कामळेवीर, रात्री कोलगाव येथील बबन नाईक यांच्या घरी, २८ रोजी सकाळी कोलगाव येथून दुपारी साटम महाराज आश्रम, रात्री आंबोली, २९ रोजी सकाळी आंबोलीहून दुपारी आजरा येथे व रात्री निपाणी, ३० रोजी सकाळी निपाणीहून दुपारी नरसिंहवाडी. रात्री मिरज, ३१ रोजी सकाळी मिरजहून दुपारी नागज येथे व रात्री सांगोला, १ नोव्हेंबर रोजी सकाळी सांगोलावरून दुपारी मठ वस्ती रात्री पंढरपूर, २ ते ५ नोव्हेंबर पंढरपूरला मुक्काम. ६ नोव्हेंबरला वारकरी आपापल्या घरी पोहोचतील.

