दोडामार्गातील मार्गातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपकडे
दोडामार्गातील मार्गातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपकडे
झरे -२ च्या सरपंचपदी श्रुती देसाई : पाटील पुनर्वसन च्या सरपंच पदी प्रवीण गवस : निवडून आलेल्या सदस्यांचे ठाकरे,शिंदे गटाकडून स्वागत
प्रतिनिधी-: दोडामार्ग
रविवारी झालेल्या झरे-२ व पाटये पुनर्वसन या दोन ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सोमवारी अखेर संपली. झरे-२ च्या थेट सरपंचपदी श्रुती विठ्ठल देसाई तर पाटये पुनर्वसनच्या थेट सरपंचपदी प्रवीण पांडुरंग गवस हे निवडून आले आहेत. या दोन्ही ग्रा. पं. वर भाजपने आपला दावा केला आहे. दरम्यान, दोडामार्ग दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या दोन्ही सरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
येथील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता या दोन्ही ग्रा. पं. च्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पाटये पुनर्वसन व त्यानंतर झरे २ ची मतमोजणी झाली.
*पाटये सरपंचपदी प्रवीण गवस*
पाटये पुनर्वसनमध्ये थेट सरपंचपदासाठी प्रवीण पांडुरंग गवस, सत्यवान विष्णू गवस, स्मिता सत्यवान गवस, सुनील हरिश्चंद्र गवस, नारायण लक्ष्मण गवस हे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील प्रवीण पांडुरंग गवस हे ११५ मते घेऊन सरपंचपदी निवडून आलेत. तर सत्यवान गवस (९४), स्मिता गवस (६७), सुनील गवस (६५) तर लक्ष्मण गवस (१५) यांना अशी मते मिळाली. प्रभाग क्रमांक १ मध्ये भिवा शिवराम गवस ८५ मते घेऊन निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी विठ्ठल पांडुरंग गवस यांना २६ मते पाटये सरपंचपदी प्रवीण गवस मिळाली. याच प्रभागात गौरवी गुरुदास गवस या बिनविरोध निवडून आल्या होत्या. प्रभाग क्रमांक दोनमध्ये महेश मोतीराम गावडे ६१ मते घेऊन विजयी झाले. याच प्रभागातील सुभाष गुंडू गवस (४४), मधुकर धोंडू गवस (२६) यांना अशी मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये श्रेया संतोष गवस ८५ मते व गुणवंती भगवान गावडे ७७ मते, देवानंद काळोजी गवस ५९ मते घेऊन विजयी झाले

