मुंबईराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तिन बैठकांचे ९ रोजी आयोजन..

▪️खासदार विनायक राऊत यांच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्ग,दि.०७: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विषयांकरिता तिन बैठकांचे आयोजन मुंबई येथे दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आले असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ओरोस येथून देण्यात आली.

सोमवार दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता, सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई यथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई देण्यासाठी येणाऱ्या जाचक अटीमध्ये सुधारणा करणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांचा पर्यटन विकास, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत येणाऱ्या अडचणी दुर करणे, सिंधुरत्न योजनेची अमंलबजावणी करणे व इतर अनुषंगिक विषयांबाबत खासदार शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत बैठक उच्च व तंत्रशिक्षण तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेवरुन आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठीस निमंत्रित महनिय व्यक्ती पर्यावरण व पर्यटन मंत्री, कृषी मंत्री, सहकार व पणन मंत्री, फलोत्पादन मंत्री, पर्यावरण व पर्यटन राज्यमंत्री, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, खासदार सुनिल तटकरे, अप्पर मुख्य सचिव (वित्त), अप्पर मुख्य सचिव, (नियोजन), प्रधान सचिव (पर्यावरण), प्रधान सचिव (पणन), प्रधान सचिव (सहकार), सचिव (पर्यटन), सचिव (कृषी व फलोत्पादन), आयुक्त, कोकण विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग, जिल्हा कृषी अधिकारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

सोमवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान वर्षा बंगला मलबार हिल मुंबई येथे मालवण सागरी अभयारण्याबाबतची राज्यवन व महसूल विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीसाठीस निमंत्रित महनिय व्यक्ती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रधान सचिव-पर्यटन, व्यवस्थापकीय संचालक एम.टी.डी.सी. अप्पर प्रधान वनसंरक्षक (कांदळवन) वनमंत्री व वनराज्य मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून आमंत्रित करण्यात आले आहे.

सोमवार दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ठिक ६:०० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान वर्षा बंगला मलबार हिल मुंबई यथे जिल्हयातील वनसंज्ञेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठीस निमंत्रित महनिय व्यक्ती वनविभागाचे मंत्री व राज्यमंत्री, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून आमंत्रित करण्यात आलेले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!