अमित शहा खोटारडे आणि विश्वास घातकी; खा.विनायक राऊत यांचा आरोप
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०८: अमित शहा खोटारडे आणि विश्वास घातकी असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. अमित शहांच्या हट्टवादी पणा मुळे एनडीए मधील सतरा ते अठरा पक्ष एनडीएतून बाहेर पडले भाजप आणि आणखी एक पक्ष सोडला तर सर्वच पक्ष भाजप पासून दुरावले त्यामुळे विश्वास घातकी नेमक कोण हे आता दिसून येतेय. केवळ भाजपच्या विश्वास घातकी पणामुळे शिवसेनेला दुर जाव लागलं. अमित शहा ज्या बंद खोली मधे चर्चा झाली म्हणतायत ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल माञ शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचं मंदीर आहे आणि त्याचं मंदीरातील दैवताने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एवढा मोठा आशिर्वाद ठेवला होता म्हणून देशाला आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिसतायत. आता नारायण राणे आणि अमित शहा यांच्या सारख्या समविचारी लोकांची यूती झाली असेल ही यूती लाईफ टाईम टीको अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच खोटारडेपणाचं राजकारण भाजप पक्षा कडून देशात होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
केंद्रात जी सत्ता आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची. खोटबोल पण रेटून बोलं याचं कारणामुळे संपूर्ण एनडीए जो अटलबिहारी वाजपेयी यांनी स्थापन केला, तो आज यांच्या खोटारडेपणामुळे विखूरला गेला, तूटलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही वारंवार खोट बोलत होता. माञ भाजपमधील अनेक लोकांना आजही वाटतेय की, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी घोडचूक केली स्वतःच्या फायद्यासाठी यूतीचा फायदा करून घेतला. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापाई यूती तूटली. हे आता दिल्लीतील भाजपचे नेते मान्य करत असल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच नारायण राणेंनी काल मेडीकल काॅलेजच्या उद्घाटन वेळी केलेल्या आरोपालाही राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
राणेंच्या हाॅस्पीटलला शिवसेनेने कदापीही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजूरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता, तो राणेंच्या कंगाल पणामुळे; असा आरोप देखील राऊत यांनी केलाय. माञ राणे आत्ता खरं बोलत असल्याचा चिमटाही राऊत यांनी राणेंना काढला आहे.
राणेंना खर बोलल्याशिवाय पर्यात नव्हता, राणेंनी एकदा नव्हे तर तीनवेळा मुख्यमंत्र्यांना फोन केला असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला आहे. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपुस करून काय काम आहे, ते विचारून घेतलं.
माञ नारायण राणे अमित शहाना खुष करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायच काम करतायत राणेंचा तो परीपाट असल्याची टीकाही राऊत यांनी पञकार परीषदेत केली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_