राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे बंद करा

अँटीकरप्शन फाउंडेशन आँफ इंडिया ची मागणी

सावंतवाडी,दि.०६: जिल्ह्यासह सावंतवाडीत सुरु असलेले अवैध दारू धंदे, मटका, जुगार आदी अवैध धंद्यामुळे तरुण पिढी वाम मार्गाला लागली असल्याने हे काळे धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी अँटी करप्शन फाउंडेशन च्या वतीने उप विभागीय पोलीस उप अधीक्षक रोहिणी सोळंखे यांच्याकडे निवेदन द्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान हे काळे धंदे बंद पाडण्यासाठी जनतेने देखील पुढे येणे गरजेचे आहे. पोलीस आणि सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन डी वाय एस पी रोहिणी साळुंखे यांनी यावेळी केले. तसेच अवैध धंद्यावर आळा घातला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!