सावंतवाडीत पक्षी सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण व सिंधु निसर्ग पर्यावरण संस्थेच्या वतीने कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रम संपन्न..

▪️जगन्नाथराव भोसले बालोद्यान ते पंचायत समिती, हनुमान मंदिर नरेंद्र डोंगरापर्यंत २६ प्रजातीचे ७६ पक्षांची गणना..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अभिमन्यू लोंढे

🎴सावंतवाडी,दि.६: शहरात पक्षी सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण व सिंधु निसर्ग पर्यावरण संस्थेच्या वतीने कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये २६ प्रजातीचे ७६ पक्षांची गणना करण्यात आली. सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले बालोद्यान येथून पक्षी गणना प्रारंभ झाला त्यानंतर पंचायत समिती, हनुमान मंदिर नरेंद्र डोंगरापर्यंत पक्षीगनणा झाली. यामध्ये पक्षीमित्रांनी सहभाग घेतला होता.

पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाने यंदापासून दि.५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्याचे धोरण अवलंबले आहे.

या पार्श्वभूमीवर वाईल्ड कोकण व सिंधु निसर्ग पर्यावरण संस्थेने पक्षी गणना आयोजन केले होते. यादरम्यान २६ प्रजातीचे ७६ पक्षी आढळले.मलबार ग्रे, काॅमन मैना, सन बर्ड,हॉर्नबिल, बार्बेट, कॉमन क्रो अशा विविध प्रजातीचे पक्षी आढळले.

पक्षीगणना झाल्यानंतर नरेंद्र डोंगरावर वाईल्ड कोकणचे अध्यक्ष धीरेंद्र होळीकर यांनी पक्षी सप्ताहानिमित्त महत्व विशद केले, तर डॉ. गणेश मर्गज यांनीदेखील माहिती दिली. यावेळी पर्यावरण प्रेमी पक्षीमित्र कै. संजय देसाई यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांनी पर्यावरण पक्षी मित्र म्हणून घेतलेल्या भूमिकेबाबत प्रा. धिरेंद्र होळीकर, डॉ गणेश मर्गज, अभिमन्यू लोंढे यांनी थोडक्यात माहिती दिली.

यावेळी वाईल्ड कोकण अध्यक्ष प्रा.धीरेंद्र होळीकर, सचिव डाॅ.गणेश मर्गज, खजिनदार महेंद्र पटेकर, कार्यकारणी सदस्य अभिमन्यु लोंढे, पत्रकार राजेश नाईक, वनपाल प्रमोद सावंत, रोहीणी नाईक,रीचा कुंडईकर, शुभम पुराणिक, ओमकार आयरेकर, अतुल बोंद्रे, प्रितम सातार्डेकर, संजय सावंत, जगदीश सावंत व वनखाते कर्मचारी उपस्थित होते.

*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*

_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._

*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_

*🤷🏻‍♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!