मान्सूनमध्ये पडणाऱ्या विजांपासून संरक्षणासाठी कोकणवासियांच्या मदतीला येणार वीज प्रतिरोधक यंत्र..
▪️राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रायगड
🎴रायगड,दि.०६: नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांना गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मान्सून काळात पडणाऱ्या विजांमुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारची आपत्ती उद्भवून मनुष्यहानी होवू नये, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाशी झालेल्या बैठकीत जिल्ह्यात सध्या कार्यान्वित असलेली बसस्थानके तसेच ग्रामपंचायत असे मिळून एकूण ८४२ ठिकाणी तसेच रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या नव्या ८२ निवारा शेडमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला होता व संबंधितांना तसे आदेश दिले होते.
त्यानुसार आता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु झाली असून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव सादर केला व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापक,राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांना अंतिम मंजूरीकरिता पाठविण्यात आला आहे. लवकरच रायगड जिल्ह्यासाठी बसस्थानके तसेच ग्रामपंचायत असे मिळून एकूण ८४२ ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल. या कामाकरिता एकूण ८ कोटी ३१ लक्ष रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाला मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.
ही केवळ रायगड जिल्ह्यापुरतीची गरज नसून याचा उपयोग शेजारील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, या भागात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास तेथेही निश्चितच होईल, याचा दूरगामी विचार करुन सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी एकूण ११८ वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्यासाठी एकूण १ कोटी ६७ लक्ष आणि ठाणे जिल्ह्यासाठी ३०७ वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्यासाठी एकूण १ कोटी ८० लक्ष ५० हजार रुपयांचा प्रस्ताव राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प व्यवस्थापकांकडे मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_