कोकणसिंधुदुर्ग

सावंतवाडीत युवासेनेकडून शिंदे सरकारचा निषेध

सावंतवाडी, ता. १५:”वेंदाता फॉक्सकॉन” ही कंपनी राज्याबाहेर घालविण्यास जबाबदार असलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारचा आज सावंतवाडी युवा सेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी “स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके अशा शिंदे सरकारचा धिक्कार असो..!!” अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. युवासेनेच्या माध्यमातून या निषेध मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अर्पणा कोठावळे, चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार, विशाल सावंत, गुणाजी गावडे, योगेश नाईक, सत्यवान गावडे, लवू गावडे, राजन गावडे, अक्षण गावडे, जयगणेश गावकर, मायकल डिसोझा, आबा सावंत, प्रशांत कोठावळे, अजित सांगेलकर, सुनिल गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!