सावंतवाडी शहरात राजरोसपणे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा वावर
🟥सावंतवाडी शहरात राजरोसपणे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा वावर
🟥शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने लोक हैराण..
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,३०: शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. आरोग्य विभाग कुचकामी ठरत आहे. तसेच भटके कुत्रे, पाळीव जनावरे वाहतूक कोंडी करत आहेत आणि माकड किंवा वानर फळझाडांची नुकसान करत आहेत. सावंतवाडी नगरपरीषद काही जबाबदारी घेऊन लोकांना त्रासातून मुक्त करणार आहे की नाही?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावंतवाडी शहरात सांडपाणी व्यवस्थापन राबविण्यात अपयश आले आहे. अनेक ठिकाणी इमारतीच्या आवारात सांडपाणी व्यवस्थापन कोलमडून गेले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी काही आहे का? ती जबाबदारी नगरपरिषद पेलत नाही त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत तसेच उघड्या गटारात सांडपाणी वाहून जाते त्यामुळे डास प्रादुर्भाव वाढला आहे. डास मुक्त सावंतवाडी शहर बनविण्यासाठी प्रयत्न केला जात नाही, हे खेदजनक आहे.
भारत स्वच्छता अभियान राबविण्यात सावंतवाडी नगरपरीषदने पुढाकार घेतला. शहरातील स्वच्छता अभियान यशस्वी झाले तर डास प्रादुर्भाव वाढला कसा? डास प्रतिबंधक उपाय राबविण्यात येणार आहेत किंवा नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरात मोकाट गुरे आणि भटके कुत्र्याचा त्रास दिवसेंदिवस वाढला आहे, ठिकठिकाणी रस्त्यावर व गल्लीबोळात या जनावराचा वावर सर्रास आढळून येत आहे, भटक्या कुत्र्याकडून तर अनेकांना चावा घेण्याचे प्रकारही घडत असतांना यावर नियंत्रण ठेवणारे पालिका प्रशासननच या समस्येपुढे हतबल असल्याचे दिसून येत आहे. वाहनांच्या समोर आल्यावर अपघातही घडत आहेत.
सावंतवाडी शहरात गेली अनेक वर्ष भटक्या कुत्र्याचा आणि गुरांची संख्या झपाट्याने वाढत आहे, वेळोवेळी नागरिकांनी यावर आवाज उठवूनही केवळ कायदेशीर बाबी आणि तांत्रिक अडचणी पुढे करत प्रशासनाने नेहमीच हात झटकण्याचा भुमिका स्विकारली आहे, परिणाम आज शहरात आज गल्लीबोळात तसेच रस्त्यावर मोकाट गुरे आणि भटके कुत्रे याचा वावर हमखास दिसून येत आहे, कुत्र्यांकडून तर अनेकांना चावा घेण्याच्या घटना शहरात घडत असतांना नागरिकांना हाॅस्पीटलच्या वाऱ्या कराव्या लागत आहे. शहरातील कुत्राची वाढती संख्या तर पालिका प्रशासनाला नव्हे तर व्यावसायिक,वाहनधारक यांनाही सहन करावी लागते. कुत्र्याच्या टोळीच्या टोळी रस्त्यावर असल्याने महीला वर्ग तसेच शालेय विद्यार्थी लहान मुले रस्त्यावरुन जाण्या येण्यास घाबरतात, बर्याच वेळा याबाबत नागराकाकडून आवाज उठवित पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले मात्र पदरी अपयशच आले.
शहरातील भटक्या कुत्र्याच्या या समस्येवर यापुर्वी दिपक केसरकर नगराध्यक्ष असतांना एका संस्थेमार्फत नसबंदी सारखा प्रयोग राबविण्यात आला होता मात्र तो अयशस्वी ठरला. म्हणजेच त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलटपक्षी पैसा वेळ यात फुकट गेला. त्यामुळे अशा प्रकारच्या उपाययोजना राबविताना प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जाते. मात्र आजची शहरातील भटक्या कुत्र्याची वाढती संख्या लक्षात घेता ही मोठी समस्या बनली असून यावर उपाय शोधून काढणे गरजेचे बनले आहे.
मोकाट गुरांच्या बाबतीतही असाच प्रकार पुढे आला आहे, पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा असूनही पालिकेने ही समस्या सोडविण्याकडेही पुर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे शहरात बाजारपेठेत तलावाकाठी आणि रस्त्यावर ठाण मांडून बसलेली ही जनावरे ठिकठिकाणी दिसुन येतात याचा त्रास मुख्यत्वे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना होतो. काही वेळा फुटपाथवरील गुरांचा वावर पादचाऱ्यांना धोकादायक ठरतो,
बर्याचदा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. वाहतुक कोंडीसारख्या समस्येला ही जनावरे कारणीभूत ठरत आहे. प्रशासनाकडून या जनावरांच्या मालकांना कल्पना देऊनही या जनावरांना कधीच वेसण लागली नाही, प्रशासनाने मध्यंतरीच्या काळात कारवाईचे पाऊल उचलताना जनावरांना पकडून त्यांच्या मालकांना दंडात्मक कारवाई केली होती. मात्र अशी कारवाई पुन्हा कधीच दिसून आली नाही, शहरातील समाज मंदिर परिसरात या जनावरांना पकडून ठेवण्यासाठी कोंडवाडा आहे, शहरातील मोकाट जनावरांना पकडून ठेऊन त्याना चारा पाणी देण्याची प्रशासकीय तजवीज आहे मात्र असे करतांना पालिका प्रशासनाकडून कधीच दिसले नाही. शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावाच्या काठावर या जनावरांचा असलेला वावर तलावाच्या काठ अस्वच्छ करण्यातही ही जनावरे कारणीभूत ठरतात, पुटपाथवर बसविण्यात आलेल्या कचराकुंडीतील कचरा तोंड घालून बाहेर काढण्याचा प्रकारही या जनावराकडून होतो त्यामुळे पुटपाथवर अस्वच्छता दिसून येते याचा त्रास मुख्यत्वे सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी तलावाकाठी फिरायला येणार्या नागरिकांना सहन करावा लागतो. बाजारपेठेतील व्यापारी व्यावसायिकांचे नुकसानही या जनावराकडून केले जाते. त्यामुळे प्रशासनाने या जनावरांच्या आणि कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी पाऊल उचलावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
_______________________
*बंपर ऑफर.. 💥बंपर ऑफर..💥 बंपर ऑफर..*
💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️
🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*
*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃
🏫🏃🏻♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻♀️🏫
👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]
*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*
👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*
👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )
👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻♀️🏃🏻♂️
🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*
📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

