सावंतवाडीसिंधुदुर्ग

कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार दत्ता देसाई यांचा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केला सत्कार

जिवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या विवाहित महिलेला कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी वाचविले त्यांचा सत्कार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते…

शालेय शिक्षण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी

आंबोलीला भेट दिली यादरम्यान आंबोलीतील बंद असलेले पर्यटन

प्रकल्प,आंबोलीतील पर्यटन स्थळांच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच नवीन पर्यटन प्रकल्प यांची पाहणी केली आणि याबाबत योग्य ते

नियोजन तसेच आराखडा तयार करून तात्काळ ते देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी दिल्या.

प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण जाधव, सहाय्यक वनसंरक्षक वर्षाराणी खरमाटे, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, वनक्षेत्रपाल विद्या घोडके कांबळे, सरपंच सावित्री पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर आदी उपस्थित होते.

यावेळी आंबोली पोलीस स्थानकाला भेट देत पोलीस स्थानकाची पाहणी केली व नव्याने पोलीस स्थानक बांधण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच कावळेसाद पॉईंट वर पोलीस चौकी असावी असे निर्देश दिले.

यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरातून वाहून जाणाऱ्या महिलेला स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या महिलेला वाचविणाऱ्या आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता देसाई यांचे यावेळी सत्कार करण्यात आला तसेच आंबोली वर्षा पर्यटनाच्या दरम्याने सुयोग्य असे नियोजन करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित गोते व त्यांच्या टीमचे ही यावेळी त्यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!