पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा
सावंतवाडी ता. १८-: राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा केला आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कचरा गोळा करत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोलाचा वाटा उचलला होता. यावेळी पुंडलिक दळवी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत या कर्मचाऱ्यांना साखर वाटली आहे.
यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका सरचिटणीस काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, शहर चिटणीस राकेश निवगी, रत्नागिरी जिल्हा महिला निरीक्षक सौ दर्शना बाबर देसाई, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला शहर अध्यक्ष एड. सायली दुभाषी, तालुका सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, महिला तालुकाध्यक्ष सौ रिद्धी रोहन परब, सौ पूजा दळवी, उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साठेलकर, तालुका सदस्य प्रकाश माडगूत, श्री वरेरकर आदी उपस्थित होते.