आंबोलीतील डॉ. खानोलकर यांचे घर काही ग्रामस्थांनी संगनमताने पाडले..
▪️घरातील लाकुड, लोखंड व किंमती सामान चोरीस..
▪️सावंतवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल; चौकशी सुरू
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०३: तालुक्यातील आंबोली येथील हॉटेल जे.आर.डी. च्या बाजुला सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे सावंतवाडीतील लहान मुलांचे डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर यांचे घर गावातील काही ग्रामस्थांनी संगनमताने जमीन दोस्त करून आतील कींमती लाकूड, लोखंडी सामान चोरुन नेल्याची तक्रार डॉ. अरविंद खानोलकर यांचा मुलगा डॉ. मिलिंद खानोलकर यांनी सावंतवाडी पोलीस स्थानकात केली आहे.

सन १९८० मध्ये रजिस्टर खरेदी खताने घेतलेल्या जमिनीत डॉ. अरविंद खानोलकर यांनी घर बांधले होते. पर्यटनासाठी आंबोलीत आल्यावर त्या घरात खानोलकर कुटुंबीय राहत असत. ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरू होती. मध्यंतरीच्या काही वर्षात खानोलकर कुटुंबीय आंबोलीत जात नसल्याचा फायदा घेत आजूबाजूच्या काही ग्रामस्थांनी संगनमताने जेसीबी लावून ते घर जमीनदोस्त केले. घराचे पत्रे, लोखंडी सामान आतील किमती सामान चोरून नेल्याची तक्रार आज सकाळी डॉ. मिलिंद खानोलकर यांनी केली आहे.

याबाबत सावंतवाडी पोलीसांनी आंबोली पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सावंतवाडी, आंबोली गावाबाहेरून पुणे, गोवा, कोल्हापूर सातारा, या ठिकाणाहून आंबोली येथे शासकीय जमिनीत अनेकांनी घरे बांधली असताना त्यांना विरोध केला गेला नाही. मात्र, स्वतःचे हक्काचे घर असताना खरेदी खताने जमीन विकत घेऊन बांधलेले घर हिरावून घेणाऱ्या त्या ग्रामस्थांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

