स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमाअंतर्गत आज बांदा येथे जनजागृती
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमाअंतर्गत आज बांदा येथे जनजागृती.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सायकलवरून बांदा गावातून जनजागृती फेरी काढून लोकांना घरोघरी तिरंगा झेंडा लावण्याबाबत आवाहन करण्यात आले या उपक्रमात पावसाची तमा न बाळगता बांदा सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच बांदा केंद्र शाळचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.यावेळी मुलांनी एकच नारा ,एकच नारा हर घर तिरंगा,हर घर तिरंगा या जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात आली.

