कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी डीएलएड सर्वोत्तम व्यासपीठ ; प्राध्यापक रुपेश पाटील यांचे प्रतिपाद

 

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८ :-* डीएलएड अभ्यासक्रमाकडे केवळ शिक्षक बनण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम म्हणून पाहू नका. दोन वर्षे प्रामाणिक अभ्यास केल्यास आणि सध्याच्या डीए एड अभ्यासक्रमाचे व्यवस्थित आकलन केल्यास, आपण शिक्षक पात्रता परीक्षाच नव्हे तर कोणतीही स्पर्धा परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतो. इतका हा सूत्रबद्ध आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण अभ्यासक्रम आहे, असे प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या वनिता विनयालय अध्यापिका विद्यालय, गिरगाव मुंबई येथे ‘शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या नीलम शिंदे, ज्येष्ठ प्रा. महादेव बाबर, प्रा. तळपाडे, प्रा. कदम, प्रा. मृणालिनी बिरारी, प्रा. मेवडा, प्रा. जगताप, प्रा. बागुल प्रा. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

वनिता विनयालय अध्यापिका विद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी’ या विषयावर बोलताना प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, छात्राध्यापाकांनी अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत असताना, जो अभ्यासक्रम शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नेमून दिला आहे, त्याच अनुषंगाने दोन वर्षे सदर डीएलएड अभ्यासक्रमाचाही अध्ययन करताना विचार करावा. जेणेकरून आपल्या या दोन वर्षात संपूर्ण शिक्षक पात्रता परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करता येईल. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षक बनण्यासाठी डीएलएड करू नये, तर विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी डीएड हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे, असेही प्राध्यापक पाटील यांनी नमूद केले.

यावेळी प्रा. पाटील यांनी उपस्थित छत्राध्यापिकांना पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशनद्वारे विविध उदाहरणासहित शिक्षक पात्रता परीक्षा कशी तयारी करता येते, हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. महादेव बाबर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. बागुल यांनी केले. व्याख्यानानंतर छत्राध्यापिकांच्या विविध शंकांचे समाधान प्रश्नोत्तरांद्वारे प्रा.रुपेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!