कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

 

अन्यथा तुमच्या आमदारकीला कलंक लागेल -संजू परब

सावंतवाडी दि. ०८ : तालुक्यात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष केले आहे,अवकाळी पाऊस,शेतीचे वन्यप्राण्यां पासून नुकसान याकडे आमदार दीपक केसरकर यांनी देखील आपल्या मतदार संघाकडे दुर्लक्ष केला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी गणेशचतुर्थी पूर्वी या सर्व कामांकडे लक्ष देऊन समस्या न सोडविल्यास तो तुमच्या आमदारकीचा तो कलंक असेल असा चिमटा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार केसरकर यांना आयोजित पत्रकार परिषदेत काढला आहे.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, दिली भालेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!