कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

अखेरीस सावंतवाडी-नेमळे एस. टी. बस सेवा मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु

अखेरीस सावंतवाडी-नेमळे एस. टी. बस सेवा मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु

या प्रवाशी वाहिनीला अडथळा नको यासाठी म.न.से.विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वाखाली मळगांव व नेमळे शाखेतर्फे विशेष प्रयत्न

मळगांव ते नेमळे दरम्यानच्या मार्गावर वाढलेली रस्त्यालगतची झाडी तोडण्याचा उपक्रम यशस्वी

मागील 4 वर्ष सुरळीत सुरु असलेली मात्र लाॅकडाऊनच्या काळात मागील काही महिन्यांपासून बंद असलेली व मळगांव व नेमळे गावातील एस. टी.प्रवाशांना खुपच सोयीची ठरणारी सावंतवाडी -नेमळे ही एस. टी. बस सेवा बंद असल्यामुळे या दोन्ही गावातील महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना खुप गैरसोय सोसावी लागत होती. ही बाब ध्यानात घेऊन ही बस सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व मळगांव नेमळे मनसे तर्फे रविवारी मळगांव- नेमळे रस्ता लाईनची झाडी जी एस. टी. बसला अडथळा ठरत होती ती झाडी व वाढलेले रान तोडण्याचा उपक्रम मनसे विद्यार्थी सेने तर्फे राबविण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष सुधीर मनोहर राऊळ यांच्या नेतृत्वाखाली झाडी तोडण्याच्या मोहिमेत आर. पी. डी. विद्यार्थी सेना युनिट अध्यक्ष साहील तळकटकर, विभाग अध्यक्ष पांडूरंग उर्फ विजय बुगडे, मळगांव शाखाअध्यक्ष राकेश परब ,नेमळे शाखाअध्यक्ष बाबुराव राऊळ
यांनी विशेष मेहनत घेतली.
मळगांव-नेमळे एस.टी.प्रवाशांसाठी खुपच सोयीची ठरणारी नेमळे-सावंतवाडी ही एस. टी. बस सेवा मागील शुक्रवार पासून पुन्हा धावू लागली आहे. यामुळे दोन्ही गावातील महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी- विद्यार्थीनीना सुलभ व जलद प्रवास मिळणार आहे.मात्र सावंतवाडी-नेमळे मार्गावरील दोन्ही गावात रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वाढलेली झाडी व रान यामुळे एस.टी.बसला अडचण ठरणार ही बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मळगांव शाखेतर्फे रविवारी मळगांव- नेमळे रस्ता लाईनच्या दुतर्फा असलेली ही झाडी व रान तोडून रस्ता मोकळा करण्याची मोहीम यशस्वी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष सुधीर मनोहर राऊळ यांच्या नेतृत्वाखालील झाडी तोडण्याच्या या मोहिमेत विभाग अध्यक्ष पांडूरंग उर्फ विजय बुगडे, मळगांव शाखा अध्यक्ष राकेश परब , नेमळे शाखा अध्यक्ष बाबुराव राऊळ, मनविसे आर पी डी काॅलेज युनिट अध्यक्ष साहील तळकटकर, मनसे कार्यकर्ते सदस्य बाबाजी तळकटकर, अनिरुद्ध शेळके, समीर मांजरेकर, निहार राऊळ, वेदांत पेंडूरकर, प्रणय पेडणेकर, कृष्णा हरमलकर, वासुदेव हरमलकर, सुखदेव राऊळ, आबा सावळ, बाळा सावळ, विकास सावळ, निळकंठ बुगडे, सुंदर सावळ, निवृत्ती मुननकर, एकनाथ मुननकर, बापु मुननकर यांनी सहभाग घेतला. या सर्वांचे मळगांव व नेमळे गावात कौतूक होत आहे.
रविवार दिनांक 7 आॅगस्ट 2022 रोजी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सावंतवाडी-नेमळे एस.टी.बसला अडथळा ठरणार असणारी झाडी तोडण्यात आली आणि ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. यामुळे आता मळगांव व नेमळे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना तसेच मळगांव व नेमळे मधील ग्रामस्थ यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे.कारण इतर गावातून ज्या बस येतात त्या तेथील प्रवाशांनी भरुन येत असतात त्यामुळे मळगांव व नेमळे गावातील महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना वेळेवर बस मिळत नाही. आता सावंतवाडी नेमळे एस. टी. बस सुरु होणार असल्याने ही समस्या सुटणार आहे.
या मनसे कार्यकर्त्यांनी ही गर्द झाडी व रान तोडून एस. टी. ला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचू नये यासाठी यशस्वी काम केले.या मोहिमेत साईल तळकटकर यांनी विशेष मेहनत घेतली. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आल्याने आता लवकरच ही बस सेवा सुरळीत पणे धावू लागणार आहे.या एस. टी. सेवेचा फायदा मळगांव व नेमळे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना व मळगांव व नेमळे मधील ग्रामस्थ यांना होणार असल्याने त्यांच्याकडून विशेष आभार व्यक्त होत आहेत.कारण इतर गावातुन ज्या बस येतात त्या तेथील प्रवाशांनी भरुन येत असल्याने मळगांव व नेमळे गावातील महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत होती.सावंतवाडी बस आगाराची सावंतवाडी-नेमळे एस. टी. बस सेवा पुन्हा सुरु झाल्याने ही गैरसोय दूर होणार आहे.
दरम्यान याबाबत जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी ,” मनसेच्या माध्यमातुन मागील 4 वर्षे ही बस सेवा सुरळीत चालू होती. मात्र लाॅकडाऊन काळात बस सेवा पुर्णपणे बंद झाली होती. ही एस. टी. बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेने विशेष प्रयत्न केले होते. या प्रयत्नामुळे ही बस सुरु झाली आहे. ही बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मळगांव नेमळे मार्गावर वाढलेली व एस. टी. बसला अडथळा होणारी झाडी तोडण्यात आली.या एस. टी. सेवेचा फायदा मळगांव व नेमळे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना तसेच मळगांव व नेमळे मधील ग्रामस्थ यांना सर्वात जास्त लाभ होणार आहे.कारण इतर गावातून ज्या बस येतात त्या तेथील प्रवाशांनी भरुन येत असल्यामुळे मळगांव व नेमळे गावातील महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना आपल्या शाळा- महाविद्यालयात पोहचण्यास उशीर होत होता. मात्र सावंतवाडी- नेमळे एस. टी. बस सुरु झाल्याने आता वेळेत
प्रवास करता येणार आहे.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!