वेताळ बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना दोडामार्ग तालुक्यातील मित्रपरिवाराकडून चटई आणि शैक्षणिक साहित्य मदत
*वेताळ बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना दोडामार्ग तालुक्यातील मित्रपरिवाराकडून चटई आणि शैक्षणिक साहित्य मदत*
कुडाळ / प्रतिनिधी
वेताळ बाबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या मित्रपरिवाराकडून तीस चटई आणि शैक्षणिक साहित्य मदत करण्यात आली.
कुडाळ वेताळ बाबार्डे शोषित मुक्ती अभियान संस्था अंतर्गत नाग्या महादू निवासी वसतिगृह गेल्या सात वर्षापूर्वी सुरु करण्यात आलं असून या वसतिगृहात मुले व मुली अशी 62 जण आहेत. या संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय आईर हे वसतिगृह चालवीत आहेत. या वसतिगृहाला दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार श्री. शंकर जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भेट दिली. व येथील शोषित मुक्ती अभियान संस्था अध्यक्ष श्री. उदय आईर यांच्याशी चर्चा केली असता या वसतिगृहाला अनेक जण आपल्या परीने सहकार्य करत आहेत. शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत वा अनुदान मिळत नसतानादेखील अनेक अडचणीना सामोरे जात हे वसतिगृह चालवीत आहे. या वसतिगृहात कातकरी समाज्यातील या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. यासाठी अनेकजणांचे सहकार्य मिळत आहे. सध्या यामुलांना चटया आणि शैक्षणिक साहित्याची गरज आहे. ही एवढी मदत मिळाली तर बर होईल असे श्री. आईर यांनी मागणी केली असता श्री. शंकर जाधव यांनी आपल्या दोडामार्ग तालुक्यातील मित्रपरिवाराकडून ही मदत करू असा शब्द यावेळी दिला. आणि श्री. जाधव यांनी श्री.छोटू येडवी (भेडशी) श्री. दया नाईक (वायंगणतड) श्री.प्रदीप नाईक (पाळये) श्री.ऋषिकेश धर्णे (साटेली) श्री. संजय गवस श्री.संदीप घाडी श्री.सागर नाईक (झरेबांबर) श्री. योगेश शेटवे (सरगवे) श्री. उदय गोलम (भेडशी) यांच्याशी या विषयासंदर्भात बोलले असता यांनी आपण मदत करूया असे सांगून तीस चटया आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.
रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी शंकर जाधव आणि सागर नाईक यांनी साहित्य स्वतः वसतिगृहातील मुलांची भेट घेऊन त्यांना दिले. हे साहित्य मुलांना मिळताच या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाच वातावरण पाहायला मिळात. दोडामार्ग तालुक्यातील या मित्रपरिवाराकडून केलेल्या या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

