आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

करूळ घाटातील रस्ता आणि बाजूची संरक्षक भिंत कोसळली

करूळ घाटातील रस्ता आणि बाजूची संरक्षक भिंत कोसळली

फोंडाघाट किंवा आंबोली या पर्यायी रस्त्याचा वापर करा; प्रशासनाच्या सूचना….

कणकवली,दि.०८: करूळ घाटातील रस्ता आणि बाजूची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. ही घटना रात्री अकरा च्या सुमारास घडली. याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी माहिती दिली .
दरम्यान प्रवाशांनी फोंडाघाट किंवा आंबोली पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पहारा ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी त्या मार्गावर वाहतूक रोखली आहे. तसेच आंबोली व फोंडाघाट या पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना केल्या जात आहे. रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने धाव घेतली असल्याचे श्री. हुलावळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!