साटेली भेडशी ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा संपन्न
साटेली भेडशी ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा संपन्न.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशासनाने ग्राम पंचायत स्तरावरून विविध कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत.त्या अनुषंगाने साटेली भेडशी ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा संपन्न झाली. घर घर तिरंगा हा उपक्रम सर्व नागरिकांनी राबविण्यात यावा, अशी माहिती देण्यात आली.9ऑगस्ट ते 17ऑगस्ट या कालावधीत अमृमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील त्यामध्ये शालेय स्तरावर विविध स्पर्धा,आरोग्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम,बँक,महिला समूह, अंगणवाडी , स्तरावरून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी सूचना देण्यात आल्या. तसेच विधवा प्रथा निर्मूलन यासंदर्भात ठराव घेण्यात आला.कृषी विभागाच्या योजना,महिला बाकल्याण विभागाच्या योजना,अशा विविध योजना विषयी माहिती या विशेष ग्रामसभेत देण्यात आली.
या ग्रामसभे साठी नवं नियुक्त ग्रामविकास अधिकारी रणदिवे मॅडम, गावचे प्रथम नागरिक सरपंच खरवत,उपसरपंच डांगी, तसेच सर्व ग्रा.प.सदस्थ, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सहाय्यक, शाळा मुख्याध्यापक, महीला ग्रामसंघ पदाधिकारी तसेच महीलांची विशेष उपस्थिती होती.

