राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सेनेत प्रवेश केलेले भाजपा कार्यकर्ते होते हे सिद्ध करावे..

भाजपचे रामचंद्र गावडे व प्रकाश गावडे यांचे सेनेच्या शशिकांत गावडे यांना आव्हान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,दि.०२: भाजपा विभागीय अध्यक्ष रामचंद्र गावडे व प्रकाश गावडे यांचे शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत गावडे यांना आव्हान केले आहे. सेनेत प्रवेश केलेले भाजपा कार्यकर्ते होते हे सिद्ध करावे. कबुलायतदार प्रश्न अंतिम टप्यात आणण्याचे खरे श्रेय भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आहे.

लोकसभा निवडणूकीतील आंबोलीचा निवडणूकीवरील बहिष्कार रातोरात आमदार दिपक केसरकर यांचे पाकीट घेऊन उठवणारे शशिकांत गावडे यांनी नसत्या उचापती करू नये. गेली तिन टर्म आमदार व तोही सत्ताधारी पक्षातील असताना कबुलायतदार प्रश्न सोडवू न शकणारे व प्रत्येक निवडणूकीपुर्वी पोकळ आश्वासन देणारे आ.दिपक केसरकर यांच्या ताब्यातील स्वतःची मालकी हक्कातील जमीन आधी शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत गावडे यांनी आधी सोडवून दाखवावी व मगच आमच्या नादाला लागावे अन्यथा झोपलेल्या वाघाला जागे केल्यावर त्याचे परिणाम काय होतात, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. अशी खरमरीत टीका शशिकांत गावडेंवर केली.

*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*

_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._

*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_

*🤷🏻‍♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!